Annual convocation of Shree Saraswati Primary and Secondary School conducted by Navnagar Shiksha Mandal at Akurdi आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

Annual convocation of Shree Saraswati Primary and Secondary School conducted by Navnagar Shiksha Mandal at Akurdi आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही व आनंदी वातावरणात पार पडले. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला.

निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी या वेळी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक गोविंद दाभाडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.

या वेळी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, योगेश देसले, धौीरेंद्र सेंगर, सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका नंदा पाटील, माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सुरेखा वाळुंज, पर्यवेक्षिका जयश्री घावटे, स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू माळे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे उपस्थित होते. छान किती दिसते फुलपाखरू, गोंधळ गीत, कोळी गीत, श्री गणेश वंदना, हिंदी चित्रपट गीते, पारंपरिक नृत्य, अशा अनेक सुमधुर गीतांवर नृत्य करत विद्यार्थ्यांनी आपले कला गुण सादर केले.

या स्नेहसंमेलनात ८५६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवित कलागुणांचा आविष्कार सादर केला. प्रास्ताविक नंदा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भारती भोंगाडे, अश्‍विनी अहिरराव, विद्या भालेराव यांनी केले.