Anti-EVM Signature Campaign ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी अभियान
देहूरोड, धम्मभूमीच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने भारतीय संविधान, कायदा व ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी अभियानास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. अभियानाचे उद्घाटन देहूरोड पोलिस ठाण्याचे अधिकारी लखनकुमार वाव्हळे यांच्या हस्ते झाले. संविधान जनजागृती अंतर्गत संविधान संवादक शीतल यशोधरा व अशोक हृदयमानव यांनी संविधानाचे भारूड सादर केले.
नागरिकांना विविध कायद्यांची तोंड ओळख व्हावी या उद्देशाने छोटी पत्रके वितरित करण्यात आली. ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी अभियानांतर्गत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीन निवेदनावर सह्या केल्या. ते निवेदन राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना सादर करून ईव्हीएम हटवून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ऑर्गनायझेशनने जाहीर केले.
संघटनेचे अध्यक्ष किरण कदम, अजय डोळस, राहुल ढाले, सुमेध घनवट, प्रियांका खंडाळे, बालाजी गायकवाड, प्रकाश ओव्हाळ यांनी संयोजन केले.