Approval of various development works at Kiwale किवळे येथील विविध विकास कामांना मंजुरी


Approval of various development works at Kiwale किवळे, रावेत, मामुर्डी येथील प्रमुख डीपी रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण तसेच पवना नदीवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या लोखंडी पुलाच्या जागेवर मामुर्डी-सांगवडे दरम्यान नवीन पूल बांधण्यासाठी 240 कोटी रुपयांच्या खर्चास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण दृष्टीक्षेपात (सर्व रक्कम रुपये) :

  • किवळे – बापदेव महाराज पुलाजवळ एक्स्प्रेस वे एक्झिट ब्रिज ते लोढा सोसायटी (सध्याचा शासकीय सेवा रस्ता) रुंदी 40 फूट, तरतूद 30 कोटी
  • मुकाई चौक ते शिंदे पेट्रोलपंप 30 मीटर रुंदीकरण, डांबरीकरणाची तरतूद 15 कोटी;
  • इंद्रप्रभा ते एमबी कॅम्प 12 मीटर रुंदीकरण व डांबरीकरणाची तरतूद 20 कोटी
  • किवळे रावेत रस्त्याला जोडणाऱ्या रुनल गेटवेच्या पलीकडे पवना नदीकडे 18 मीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण, ड्रेनेज, एसटीपीच्या कामांसह 30 कोटींची तरतूद
  • रावेत-किवळे (रावेत ते किवळे स्मशानभूमीतील जुना पूल) पवना नदीकाठी 18 मीटर नवीन रस्त्याचे बांधकाम 70 कोटींची तरतूद
  • कुणाल इकोनिया, मामुर्डी सर्व्हिस रोड, द्रुतगती मार्गाजवळ, मामुर्डीगाव 18 मीटर, किंमत 25 कोटी.
  • पवना नदीवर सांगावडे-मामुर्डी दरम्यान सध्याच्या पीडब्ल्यूडी खात्याच्या लोखंडी पुलाच्या ठिकाणी १२ मीटर रुंदीच्या नवीन पुलाची उभारणी, तरतूद ५० कोटी