Arun Firodia Calls for Hinjewadi’s Inclusion in Pimpri-Chinchwad Municipality to Boost IT Industry पिंपरी-चिंचवडचे शहर आयटी हब बनवण्यासाठी हिंजवडीला महापालिकेत समाविष्ट करा, अरुण फिरोदिया यांचे आवाहन

PCMC implementing GRAP plan to decrease pollution महापालिकेच्या वतीने प्रदूषण निर्मूलनासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP)
पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना ‘पीसीएमसी टॉप टेन’ पुरस्कार देण्यात आले. फिरोदिया यांनी या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सहभागी होऊन आपले विचार मांडले. या कार्यक्रमात महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
फिरोदिया यांनी सांगितले की, तंत्रज्ञान उद्योगाच्या विकासामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चांगले दिवस आले आहेत आणि भविष्यात आणखी चांगले दिवस येतील. ते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीचा समावेश करून ‘पिंपरी-चिंचवड-हिंजवडी महापालिका’ असे नामकरण केले जावे, ज्यामुळे शहराची ओळख ऑटोमोबाईल उद्योगाबरोबरच आयटी हब म्हणूनही होईल.
फिरोदिया यांनी पिंपरी-चिंचवडच्या ऐतिहासिक विकासावरही प्रकाश टाकला. त्यांनी 1970 पासून पिंपरी-चिंचवडशी असलेला संबंध आणि शहरातील मोठ्या उद्योगांबद्दल चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रातील योगदानासाठी कृष्णकुमार गोयल, गणेश यादव, ऋतुराज गायकवाड, इरफान सय्यद, संदीप साकोरे, विजय जगताप, डॉ. लक्ष्मण गोफणे, आणि डॉ. बी.सी. डोळस यांना सन्मानित करण्यात आले.