Arun Firodia Urges Women to Lead Startups and Take Advantage of Government Schemes अरुण फिरोदिया यांचे आवाहन: महिलांनी स्टार्टअप उद्योग उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा

0
Arun Firodia Urges Women to Lead Startups and Take Advantage of Government Schemes अरुण फिरोदिया यांचे आवाहन: महिलांनी स्टार्टअप उद्योग उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा

Arun Firodia Urges Women to Lead Startups and Take Advantage of Government Schemes अरुण फिरोदिया यांचे आवाहन: महिलांनी स्टार्टअप उद्योग उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा

पिंपरी, ११ मार्च:पुणे शहरातील महिलांचा कार्यशीलतेचा गौरव करताना, कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतःचे स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पुण्यात महिलांची कार्यक्षमता आणि त्यांच्या सशक्ततेचा अभिमान व्यक्त करत, अरुण फिरोदिया यांनी महिलांना शासनाच्या पिंक रिक्षा योजनेसारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आणि सायकल चालवण्यासारख्या पुण्याच्या विशेषत्वाचा गौरव केला.

दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित “दुर्गाशक्ती पुरस्कार” सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊन समाजात आपला ठसा उमठवावा, असे सांगितले.

कार्यक्रमाला महापालिका अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उद्योजिका जयश्री फिरोदिया, एम.आय.टी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुनिता कराड, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, ए.बी.पी माझाच्या पत्रकार शिवानी पांढरे, माजी नगरसेविका शैलजा मोरे, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात, दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर आणि इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते जयश्री फिरोदिया, डॉ. सुनिता कराड, ए.बी.पी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, स्नेहल नवलाखा आणि सामाजिक कार्यकर्त्या अनमोल पुणेकर यांना दुर्गाशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

डॉ. सुनिता कराड यांनी महिलांना आणि मुलींना आधुनिक तंत्रज्ञान शिकून कौशल्य विकास करण्याची आवाहन केली. महापालिका अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी महिलांसाठी काचघर सारख्या प्रकल्पांची माहिती दिली आणि त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी गोविंद वाकडे यांनी महिलांनी राजकारणात अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली, तसेच इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी महिलांना उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पुरक संधी देण्याची हमी दिली.

दुर्गा भोर यांनी महिलांच्या सुरक्षा बाबत विचार मांडत, स्व:रक्षणासाठी प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी महिलांना आणि मुलींना मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी अधिक जागरूक व्हायचं आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed