Ashtavinayak Darshan Special ST Bus on the occasion of Sankashti Chaturthi संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन विशेष एसटी बस
महिलांना ५० टक्के
सवलत तर ७५ वर्षांवरील
ज्येष्ठांना मोफत प्रवास
वल्लभनगर, संकष्टी चतुर्थीनिमित्त येत्या १७ जानेवारीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पिंपरी- चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा खुली करण्यात आली आहे.
वल्लभनगर येथील पिंपरी- चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शन बस शुक्रवारी (दि. १७ जानेवारी) सकाळी सात वाजता सुटणार आहे. या गाडीचे प्रौढ आणि मुलांकरिता तिकीट दर वेगवेगळे असणारआहेत.प्रौढांसाठी ९९० रुपये ते १,००५ रुपये, तर मुलांसाठी ५०० ते ५०५ रुपयांपर्यंत दर असतील. ओझर (भक्त निवास) येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय असून, तो खर्च प्रत्येक प्रवाशाने स्वतः करावयाचा आहे.
महिला सन्मान योजनेअंतर्गत आणि ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्केसवलत देण्यात आली आहे. याशिवाय ७५ वर्षांवरील अमृतज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या सर्व योजनांचा लाभ प्रवाशांना अष्टविनायक दर्शनसाठी घेता येणार आहे.
या बससेवेसाठी ऑनलाइन आरक्षण सुरू झाले असून, एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आणि पवर आरक्षण करता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड आगार प्रमुख बालाजी सुर्यवंशी यांनी केले आहे.