Attention to constructions within ‘PMRDA’ limits ‘पीएमआरडीए’ हद्दीतील बांधकामांवर लक्ष

0
Attention to constructions within 'PMRDA' limits 'पीएमआरडीए' हद्दीतील बांधकामांवर लक्ष

Attention to constructions within 'PMRDA' limits 'पीएमआरडीए' हद्दीतील बांधकामांवर लक्ष

पिंपरी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पथकाकडून निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून, यंदा वर्षभरात सुमारे साडेतीनशे बांधकामांचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये अनधिकृत असलेली सुमारे ९५ बांधकामे, होर्डिंग हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने केली आहे. पुढेही ही कारवाई सुरूच ठेवली जाणार असून बांधकामांचे सर्वेक्षणदेखील केले जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.

‘पीएमआरडीए’ पथकाकडून अनधिकृत बांधकामे, पोस्टर आदींवर निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यंदा वर्षभरात सुमारे साडेतीनशे बांधकामांचे सर्वेक्षण झाले आहे. जूनपर्यंत प्राधिकरणाच्या या पथकाने साडेतीनशे ठिकाणांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी ९५ अनधिकृत बांधकामे, धोकादायक होर्डिंग हटवण्यात आले. त्यापैकी २४ होर्डिंग आहेत. दरम्यान, नोटीस देवूनही बांधकाम सुरू ठेवून, नियमभंग करणाऱ्या ५ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. येथून पुढे अनधिकृत कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंगसह अनधिकृत बांधकामांचा सव्र्व्हे सुरु असून, अशा अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात येत असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या सह-आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. या पूर्वी प्रशासनाने लोणीकंद, केसनंद (ता. हवेली) येथील अनधिकृत होर्डिंगसह बांधकाम काढून टाकत कारवाईला सुरवात केली होती. अनधिकृत होर्डिंग, सोसायटीतील सदनिकाधारकांनी अनधिकृतपणे केलेले पत्राशेड क्रेन, गॅस कटर आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित साडेतीनशेपेक्षा अधिक बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकारी अनधिकृत बांधकाम करू नये, असे सातत्याने आवाहन करत आहेत. तरीही ही बांधकामे उभारल्यास प्रशासन कारवाई करत आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार राजेंद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत ही कारवाई केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *