Beaten with a wooden stick over a pre-existing enmity पूर्ववैमनस्यातून लाकडीदांडक्याने मारहाण

0

पूर्वी झालेल्या भांडणातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास पिंपरीतील रमाबाईनगर येथे घडली. अविनाश भीमा कांबळे (वय 23, रा. लिंक रोड, रमाबाईनगर, पिंपरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक सिंग टाक (वय 42, रा. पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश हे मंगळवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास दावतवाला दुकानात मित्रासोबत गप्पा मारत होते. मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर ते जेवणासाठी घरी निघाले होते. तेवढ्यात संशयित दीपक सिंग टाक हा तेथे आला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, रस्त्यावर पडलेले लाकडी दांडके उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दीपकसिंग टाक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *