Beating by a boy in Thergaon area थेरगाव परिसरातमुलाकडून मारहाण
थेरगाव, अल्पवयीन मुलगा त्याची आई आणि भावाला मारहाण करत होता. त्याला अडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला आणि तरुणाच्या कुटुंबीयांना मुलाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे थेरगाव येथे घडली. याप्रकरणी मीराबाई राजेंद्र बोरसे (५५, रा. वडगाव मावळ) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १६ वर्षीय मुलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संजय हा थेरगाव येथे राहतो. त्यांच्या शेजारी राहणारा अल्पवयीन मुलगा त्याची आई आणि भावाला मारहाण करत होता. त्यामुळे संजय हे भांडण सोडविण्यासाठी गेले