Beautification and safety of city roads necessary – shekhar singh शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण व सुरक्षा आवश्यक – आयुक्त शेखर सिंह

Image
शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण व सुरक्षा आवश्यक – आयुक्त शेखर सिंह

Beautification and safety of city roads necessary – shekhar singh शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण आणि सुरक्षेसाठी नागरिकांचा सहभाग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत आणि पादचारी, लहान मुले आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक जागा सुरक्षित करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या मदतीने हरित सेतू हा अभिनव उपक्रम राबविणार आहोत. हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी शहरी रस्ते आणि सार्वजनिक क्षेत्र विकास या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, यावर आयुक्त शेखर सिंह यांनी भर दिला.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटीज अंतर्गत नागरी रस्ते आणि सार्वजनिक क्षेत्रांचा नागरिक-केंद्रित पद्धतीने विकास करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये ‘शहरी रस्ते आणि सार्वजनिक क्षेत्र विकास’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळांची मालिका आयोजित केली आहे. या कार्यशाळांचा उद्देश रस्ता बांधकामातील आधुनिक उपायांवर व्यावहारिक सादरीकरणाद्वारे तसेच चर्चेद्वारे चर्चा करणे, रस्ते बांधणीच्या टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करणे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे हा आहे. या मालिकेतील तिसरी राष्ट्रीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड शहरात निगडी येथील जी.डी. माडगूळकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 12 आणि 13 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली आहे. आज आयोजित या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आयुक्त सिंह त्या वेळी बोलत होते.

Image
Image

You may have missed