Bhoomi Pujan of Ahilyanagar Maharashtra Kesari Wrestling Tournament अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भूमिपूजन
अहिल्यानगर, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. २९ जानेवारीपासून अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ तयार केला जाईल,असे मोहाळ यांनी सांगितले. मोहाळ स्वत: एक कुस्तीपटू असून आता राज्यमंत्री आहेत. त्यांच्या हस्ते या मैदानाची पायाभरणी करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२५ची शानदार सुरुवात मातीपूजन सोहळ्याने झाली. यावेळी शिवाजीराव कर्डीले, अरुणकाका जगताप, रामदास तडस साहेब, पै. संदिप (आप्पा) भोंडवे, हिंद केसरी पै. योगेश दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या कुस्तीच्या परंपरेला वंदन करत ह्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी ही महास्पर्धा अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथे पार पडणार आहे. महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा अनेक गुस्तीगीरांनी पुढे नेली त्याच पारंपरिक खेळाला पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढे नेण्याचे काम अहिल्यानगरमधून होत असल्याचा अभिमान वाटतो. येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तमाम कुस्तीप्रेमींनी आणि अहिल्यानगरकरांनी महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेला अवश्य भेट द्यावी आणि हा थरार अनुभवावा.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी भव्य व दिव्य स्पर्धा पार परणार आहे. अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रामदास भाऊ तळस व आमच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नातून या ठिकाणी ही स्पर्धा झाली. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनीही या स्पर्धेत येण्याचे मान्य केले असून हजारो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची कुस्तीगीर वर्षभर वाट पाहत असतात.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ