bhosari PMRDA पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने भोसरी पेठ परिसरात असलेल्या 120 दुकानांसाठी ई-लिलाव सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ही दुकाने निवासी योजना क्रमांक 12 चा भाग आहेत, ज्यात 4,800 सदनिका आहेत. ही दुकाने 80 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्याची नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. या ई-लिलावामध्ये उपलब्ध दुकाने किमान 10.36 चौरस मीटर क्षेत्रफळापासून ते कमाल 23.09 चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंत आहेत.
दुकानांसाठी किमान विक्री किंमत 8,55,000 रुपये आहे, तर कमाल विक्री किंमत 19,07,580 रुपये आहे.
नोंदणी प्रक्रिया सध्या खुली आहे आणि अर्जदार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात. दुकानांसाठी अर्ज करण्याची 12 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत होती. पण नुकत्याच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या ऑफिसिअल ट्विटर हँड्लर वरून केलेल्या ट्विट नुसार 24 जुलै 2023 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत वाढविन्यात आली आहे.
इच्छुक व्यक्ती ई-लिलावासाठी खालील वेबसाइटवर नोंदणी करू शकतात:
https://eauction.gov.in
ई-लिलाव प्रक्रिया दिनांक २२ ऑगस्ट २०२३ सकाळी ११. वाजल्यापासून eAcution पोर्टलवर होणार आहे.