BJP Maharashtra Holds Review Meeting on Organizational Expansion BJP Achieves 1.36 Crore Primary Membership Target भाजपा महाराष्ट्र संघटन पर्व आढावा बैठक संपन्न १ कोटी ३६ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण
BJP Maharashtra Holds Review Meeting on Organizational Expansion BJP Achieves 1.36 Crore Primary Membership Target भाजपा महाराष्ट्र संघटन पर्व आढावा बैठक संपन्न १ कोटी ३६ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण
भारतीय जनता पार्टी (भा.ज.प.) महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व आढावा बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीमधून आणि कार्यकारी अध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
बैठकीत प्रारंभिक सदस्य मोहिमेच्या यशाबद्दल चर्चा करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितले की, “सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. या मेहनतीमुळेच आज १ कोटी ३६ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचा पल्ला गाठला आहे आणि दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत.”
चव्हाणजी यांनी सदस्य मोहिमेच्या यशावर समाधान व्यक्त करत, आगामी काळात पक्षाच्या विस्तारावर अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. “आता सदस्यता मोहिम पूर्ण केली तरी आपल्याला थांबायचे नाही, तर पक्षाचा विस्तार आणखी वर्धित करायचा आहे,” असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला आमदार शंकर जगताप, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार श्री. चैनसुख संचेतीजी, प्रदेश महासचिव आमदार श्री. विक्रांतजी पाटील, प्रदेश महामंत्री श्री. राजेशजी पांडे, प्रदेश महामंत्री ॲड. माधवीताई नाईक, प्रदेश महामंत्री श्री. संजयजी केनेकर, तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. नामदेव ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत सदस्य नोंदणीसंबंधी आणि पक्षाच्या आगामी रणनीतीवर विचारविमर्श करण्यात आला.