Blood Donation Camp at Simonds Marshall, 289 Participants Donated Blood सिमन्डस मार्शल कंपनीत रक्तदान शिबिर, २८९ रक्तदात्यांचा सहभाग

Blood Donation Camp at Simonds Marshall, 289 Participants Donated Blood सिमन्डस मार्शल कंपनीत रक्तदान शिबिर, २८९ रक्तदात्यांचा सहभाग
चाकण, चाकण एमआयडीसीमधील सिमन्डस मार्शल लि. कंपनीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २८९ जणांनी रक्तदान केले. पिंपरी चिंचवड रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले.
कंपनीचे संचालक नवरोझ मार्शल यांनी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णमोहन, एच.आर. हेड नितीन दबडे, कामगार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भोर, अधिकारी रुशाद गोकल आणि मच्छिंद्र ढवळे संघटनेचे सचिन जाधव, सुहास माने, गणेश बाराथे उपस्थित होते.
प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण गुरव, राकेश चासकर, शिवराम गवस, अभिजीत वैराळे, राजशेखर आचार्य, मोहन निकुंभ, आणि मगन वसावे यांनी परिश्रम घेतले.