Bulldozers to run residential school for rapists: Mahesh Landge बलात्कार करणाऱ्यांच्या निवासी शाळेवर बुलडोझर चालणार – महेश लांडगे

बलात्कार करणाऱ्यांच्या निवासी शाळेवर बुलडोझर चालणार - महेश लांडगे
Bulldozers to run residential school for rapists: Mahesh Landge बलात्कार करणाऱ्यांच्या निवासी शाळेवर बुलडोझर चालणार – महेश लांडगे

Bulldozers to run residential school for rapists: Mahesh Landge पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नौशाद शेख विरोधात भाजप आणि हिंदू संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांची क्रिएटिव्ह ॲकॅडमी म्हणजेच निवासी शाळा आम्ही बुलडोझ करू, असा इशारा भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. नौशाद शेखने 2014 मध्येही असेच केले होते. त्यावेळी त्याच्यावर कडक कारवाई झाली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची हिंमत वाढत आहे. त्यांची ही वृत्ती मोडीत काढण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, असे आवाहन भाजप आमदार उमा खापरे यांनी केले आहे. यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख यांनी दहावीच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना २ फेब्रुवारी रोजी समोर आली होती. याप्रकरणी नौशादला अटक करण्यात आली होती. नौशाद अहमद शेख हे पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे क्रिएटिव्ह ॲकॅडमी ही निवासी शाळा चालवतात. 2021 मध्ये पीडितेच्या वडिलांनी तिला नवव्या वर्गात निवासी शाळेत दाखल केले. यासाठी पीडितेच्या वडिलांनी 2 लाख 26 हजार रुपये दिले होते. नौशाद शेख हे मुलींच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. पीडित मुलगी 14 वर्षांची असताना शेखने मुलीवर बलात्कार केला. 2022 मध्ये त्याने तिला फ्लॅटवर बोलावून पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने शेखला विरोध केला. त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली होती.