Call for Early Election of Maharashtra Boxing Association महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक लवकर घेण्याचे आवाहन

Call for Early Election of Maharashtra Boxing Association महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक लवकर घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेची कार्यकारिणी अस्तित्वात नसल्यामुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) यांनी राज्यात नेमलेल्या समितीतर्फे निवड चाचणी घेऊन महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धांना पाठविला जातो. परंतु, गेली दोन वर्षे राज्य अजिंक्यपद स्पर्धांच्या आयोजनाअभावी खेळाडूंना पाच टक्के आरक्षण, वाढीव गुण अशा योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे, असा दावा संघटनेने केला आहे.
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेची निवडणूक लवकर घ्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
संघटनेचे माजी महासचिव व उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांच्या नेतृत्वाखाली, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, पुणे जिल्हा महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर खजिनदार अमोल सोनवणे व इंदापूर तालुका संघटनेचे प्रतिनिधी राजू जठार यांच्या शिष्टमंडळाने इंदापूर येथे भेट घेतली. यावेळी भरणे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारिणीची मुदत २९ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे.