CM Devendra Fadnavis to Inaugurate Dhanashree Super Specialty Hospital in Moshi मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मोशीतील धनश्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

0
CM Devendra Fadnavis to Inaugurate Dhanashree Super Specialty Hospital in Moshi मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मोशीतील धनश्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

मोशी, मोशी येथील धनश्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ६) दुपारी एक वाजता होणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या संचालक डॉ. सलोनी पटवर्धन यांनी दिली. उद्घाटन समारंभात खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, दिलीप वळसे-पाटील, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, अमित गोरखे, उमा खापरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोशी आळंदी-बीआरटी रस्त्यावर १०१ खाटांची क्षमता असलेले हे हॉस्पिटल सुरू होत आहे. या हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरी, कॅथ लॅब, अजिओप्लास्टी, रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट, स्त्रीरोग, बालरोग, आयव्हीएफ सेंटर, ३० खाटांचे आयसीयू, पीआयसीयु, एनआयसीयु, प्रसूती विभाग, ६ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, २४ तास सिटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, २४ तास एक्सिडेंट व ट्रॉमा सेंटर, आणि दुर्बीणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया यासारख्या अत्याधुनिक सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. राजीव पटवर्धन व डॉ. अपूर्व पटवर्धन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed