Computer Engineer Young Woman Defrauded of 35 Lakhs, Accused Arrested संगणक अभियंता तरुणीची ३५ लाखांची फसवणूक; आरोपीला अटक

0

पोलिसांनी बाणेरमध्ये संगणक अभियंता तरुणीची ३५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात साईश विनोद जाधव (वय २५, रा. चेंबूर) या तरूणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती .

फिर्यादी तरुणी एक माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करते. मे २०२३ मध्ये आरोपी जाधवने ऑनलाइन मॅरेज पोर्टलवर लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तो बाणेर परिसरात तिला भेटायला गेला. त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान त्याने वेळोवेळी ३५ लाख २५ हजार ७६० रुपये घेतले.

तरुणीने त्याच्याशी विवाहाबद्दल विचारले असता, त्याने अस्पष्ट उत्तरं दिली, ज्यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. नंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली आणि तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed