Contractor Hit Hard: PMRDA Freezes £1.6 Million Over Faulty Construction कंत्राटदारांना दणका: पीएमआरडीएने थांबवले १६ कोटी; त्रुटी सुधारण्याचे आदेश

0
Contractor Hit Hard: PMRDA Freezes £1.6 Million Over Faulty Construction कंत्राटदारांना दणका: पीएमआरडीएने थांबवले १६ कोटी; त्रुटी सुधारण्याचे आदेश

Contractor Hit Hard: PMRDA Freezes £1.6 Million Over Faulty Construction कंत्राटदारांना दणका: पीएमआरडीएने थांबवले १६ कोटी; त्रुटी सुधारण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सेक्टर १२ येथे गृहप्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्याचे आदेश ‘पीएमआरडीए’ने बांधकाम कंत्राटदारांना दिले आहेत. तसेच, काम पूर्ण होईपर्यंत त्यांची देय रक्कम थांबवण्यात आली आहे.

हा गृहप्रकल्प पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आला आहे आणि यात ४ हजार ८८३ सदनिका आहेत. यापैकी जवळपास ७० टक्के लाभार्थी येथे वास्तव्यास आहेत. रहिवाशांनी घरांमध्ये असलेल्या गळती, निकृष्ट बांधकाम, मलनिःस्सारण वाहिनीतून येणारी दुर्गंधी आणि सौर ऊर्जा यांसारख्या समस्यांविषयी तक्रारी केल्या होत्या. या नागरिकांनी थेट आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला.

या तक्रारींनंतर अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली आणि संबंधित कंत्राटदाराला सदनिकाधारकांच्या अडचणी सोडवून अटी शर्तीनुसार कामे करण्याचे निर्देश दिले. मात्र, कंत्राटदाराच्या कामाची गती अपेेक्षित नसल्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली होती. प्रकल्पातील त्रुटींची तपासणी करण्यासाठी ‘सीओईपी’ महाविद्यालयाला सांगण्यात आले होते. त्यांचा अहवाल येईपर्यंत संबंधित बांधकाम कंत्राटदारांना देय असलेली सुमारे १६ कोटी रुपयांची रक्कम थांबविण्यात आली होती.

आता प्रशासनाला ‘सीओईपी’चा अहवाल मिळाला आहे. या अहवालात प्रकल्पातील काही त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. ‘पीएमआरडीए’ने कंत्राटदारांना त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे एकही तक्रार राहणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले की, गृहप्रकल्पातील तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार ‘सीईओपी’कडून अहवाल प्राप्त झाला आहे आणि तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांची रक्कम थांबवून ठेवली होती. सध्या गृहप्रकल्पातील सर्व कामे व्यवस्थित करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed