Cricketer Bhavika Ah ire’s Victory Paradeक्रिकेटपटू भाविका अहिरेचीविजयी मिरवणूक

Cricketer Bhavika Ah ire's Victory Paradeक्रिकेटपटू भाविका अहिरेचीविजयी मिरवणूक
भोसरी, मलेशियातील आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाच्या विजयात यष्टिरक्षक-फलंदाज भाविका अहिरेचा महत्वपूर्ण वाटा होता. या विजयाच्या आनंदात इंद्रायणीनगर येथील राहत्या सोसायटीजवळ विजयी मिरवणूक काढली गेली, तसेच भाविकाचा नागरी सत्कार करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी भाविकाचा विमानतळावर स्वागत केले. यावेळी भाविकाचे वडील मनोजकुमार अहिरे, प्रशिक्षक संजय हाडके आणि सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. मडिगेरी यांनी म्हटले की, भाविका आणि ईश्वरी अवसरे यांनी पिंपरी-चिंचवडचा गौरव केला आहे आणि या विजयानंतर अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल.