5th Day Demolition of 553 Structures in Kudalwadi Anti-Encroachment Drive, Strong Support from Municipal Corporation and Police कुदळवाडीतील अतिक्रमण विरोधी कारवाईत ५५३ बांधकामे पाडली, महापालिका आणि पोलिसांचा मोठा पाठिंबा

चिखली, महापालिकेने गुरुवारी (ता. १३) कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने, आणि बांधकामांवर सलग सहाव्या दिवशी मोठी कारवाई केली. या कारवाईत १३४ एकरांतील ५८ लाख चौरस फूट क्षेत्रावर ५५३ बांधकामे पाडण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण धडक कारवाई पथकामध्ये चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, १८० जवानांचे महाराष्ट्र सुरक्षा दल, ६०० पोलिस अधिकारी, आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले. ४४ पोकलेन, आठ बुलडोझर, एक क्रेन, आणि चार कटर यंत्रांचा वापर करण्यात आला. यासोबतच अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिकेने सांगितले की, आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई सुरूच राहणार आहे.