Deputy Chief Minister Ajit Pawar will inaugurate the ‘Purple Celebration’ today. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ‘पर्पलजल्लोष’ चे उद्घाटन होणार
चिंचवड, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या पर्पल जल्लोष या देशपातळीवरील कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. १७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रमुख पाहुणे म्हूण उपस्थित राहणार आहेत. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे १७ ते १९ जानेवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
purple jallosh 2025 दिव्यांगांचा महाउत्सव
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने पर्पल जल्लोष -दिव्यांगांचा महाउत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मोशी, भोसरी आणि रावेत येथील तीन जागा ‘पीएमआरडीए’ कडून ‘पीएमपी’ला हस्तांतरित
भारतातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा दिव्यांगांसाठीचा पहिलाच भव्य उत्सव असून कल्याणासाठी उचललेले एक अग्रगण्य पाऊल आहे. पर्पल जल्लोष हा महोत्सव दिव्यांगांच्या दिव्यांगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा तसेच दिव्यांगांच्या क्षमतामध्ये वाढ करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
चिंचवडमध्ये जुगारात हारल्याने, बहिणीचे 9 लाखांचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
या महोत्सवाचा उद्देश सामाजिक विकासातील अडथळे दूर करण्यास चालना देणे, दिव्यागांबाबत समाजात असलेल्या प्रचलित विचारांविषयी प्रबोधन करणे, दिव्यांग व्यक्तीं विषयी समाजात असलेले नकारात्मक समज बदलण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांचे सर्वांगीण समावेशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा आहे.