Dr. D. Y. Patil College Successfully Hosts Senior Citizens Camp डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक शिबिराचे यशस्वी आयोजन

प्रातिनिधिक छायाचित्र: डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक शिबिराचे यशस्वी आयोजन
आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या वतीने एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्राचार्य डॉ. मोहन वामन अध्यक्षपदी होते. डॉ. अविनाश सांगोलेकर, विश्वास पटवर्धन व गजानन पातुरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी अविनाशपाचष्टीमधून गझलचा इतिहास सांगितला आणि त्यांनी लिहिलेल्या काही मराठी हास्य गझलांचे सादरीकरण केले. विश्वास पटवर्धन यांनी वेगवेगळ्या राशीच्या लोकांचे स्वभाव गुण हास्य विनोदातून मांडले. गजानन पातुरकर यांनी हास्य विनोदातून समाजाची वास्तविकता वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे स्पष्ट केली.
हे शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या बालपणीच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनाची आठवण करून देणारे ठरले. प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. आकाश शिकें यांनी पाहुण्यांचा परिचय सांगितला. हिंदी विभागप्रमुख प्रा. त्रिवेणी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्वप्नाली बिरनाळे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. रोहिणी पाटील व प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले.