Dr. Kunda Tai Sanjay Bhise Honored with ‘Woman Inspirator Award’ by AISSMS AISSMS कडून डॉ. कुंदाताई संजय भिसे यांना ‘वुमन इंस्पिरेटर अवॉर्ड’

0
Dr. Kunda Tai Sanjay Bhise Honored with 'Woman Inspirator Award' by AISSMS AISSMS कडून डॉ. कुंदाताई संजय भिसे यांना 'वुमन इंस्पिरेटर अवॉर्ड'

Dr. Kunda Tai Sanjay Bhise Honored with 'Woman Inspirator Award' by AISSMS AISSMS कडून डॉ. कुंदाताई संजय भिसे यांना 'वुमन इंस्पिरेटर अवॉर्ड'

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (AISSMS) इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वुमन इंस्पिरेटर अवॉर्ड मध्ये उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांना सन्मानित करण्यात आले. आरोग्य, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण, समाजकल्याण, महिला सक्षमीकरण, युवक कल्याण अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ. कुंदाताई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार ऑक्सिरिच उद्योग समूहाच्या सौ. जान्हवी पुनीत बालन, पुणे महानगरपालिकेच्या सचिव योगिता भोसले, बँक ऑफ बडोदाच्या जनरल मॅनेजर कविता सिंग, आणि शिक्षणतज्ञ गुरुबन्नास कौर कामो यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात AISSMS चे मार्केटिंग हेड शाशा शेळके, AISSMS IOT चे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे आणि इतर मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. कुंदाताई भिसे यांच्या कामगिरीला कृतज्ञता व्यक्त करत, त्यांचे कार्य समाजातील विविध घटकांसाठी प्रेरणा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *