Education Minister Bhuse visited pcmc municipal school शिक्षणमंत्री भुसे यांचीपालिका शाळेस अचानक भेट
पिंपरी, काल राज्याचे शालेय शिक्षणमंत्रीदादासाहेब भुसे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 52-53 या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला.
शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव, तसेच त्यांच्या समोरील अडचणी यावर संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण व आपुलकीने संवाद साधला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांकडून कविता ऐकून घेतली.
चिंचवडमध्ये कंटेनरची धडक, दुचाकीवरील जोडपे जखमी
भेटीवेळी शाळेत आरोग्य विभागाच्या टीम मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू होती. या तपासणीची पाहणी केली. तसेच शाळेतील आरोग्यविषयक सुविधा आणि स्वच्छते संबंधित व्यवस्थेची माहिती घेतली. शाळेच्या इतर सुविधा, शैक्षणिक साहित्य व व्यवस्थापनाचीही तपासणी केली. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
चिखलीत विभक्त राहणाऱ्या पत्नीवर चाकूने वार
याप्रसंगी शिक्षण उपसंचालक हारुण आत्तार, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर, पिंपरी-चिंचवड मनपा शिक्षणाधिकारी संगीता बांगर, शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास पाटील आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अण्णा जाधव व शिक्षकवृंदाच्या कामाचे दादासाहेब भुसे यांनी समाधान व्यक्त केले.