Eknath Shinde to be Honored with ‘Jagadguru Sant Tukaram Maharaj Award’ in Dehu श्रीक्षेत्र देहू संस्थानतर्फे एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार’ जाहीर

Eknath Shinde to be Honored with 'Jagadguru Sant Tukaram Maharaj Award' in Dehu श्रीक्षेत्र देहू संस्थानतर्फे एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार’ जाहीर
मुंबई देहू, दि. १४ मार्च: श्रीक्षेत्र देहू संस्थानच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्याची घोषणा केली आहे. हा सन्मान सोहळा श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित केला जात आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदायासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आली.
संत तुकाराम महाराज यांचे विचार आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य त्याच परंपरेला चालना देणारे आहे. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या विकासाबरोबरच अध्यात्मिक संस्कृतीला देखील मोठे महत्त्व दिले आहे.