Extension After Extension: Uncertainty Looms Over Pimpri-Chinchwad’s 5,500 CCTV Cameras पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सीसीटीव्ही प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ, खर्चात वाढ

0
Extension After Extension: Uncertainty Looms Over Pimpri-Chinchwad's 5,500 CCTV Cameras पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सीसीटीव्ही प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ, खर्चात वाढ

Extension After Extension: Uncertainty Looms Over Pimpri-Chinchwad's 5,500 CCTV Cameras पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सीसीटीव्ही प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ, खर्चात वाढ

पिंपरी चिंचवड, १६ मार्च: केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियान गुंडाळले असले तरी, पिंपरी-चिंचवड शहरात ५,५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अजूनही सुरू आहे. या कामाला यापूर्वीच तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता महापालिकेने सल्लागाराला पुन्हा दीड वर्षांची चौथी मुदतवाढ दिली आहे, ज्यासाठी महानगरपालिकेला अतिरिक्त ३ कोटी ९५ लाख ९६ हजार ४० रुपये खर्च येणार आहेत.

या प्रकल्पात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, उर्वरित कॅमेरे बसवणे, स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट आणि इतर कामे शिल्लक आहेत. सल्लागाराला हे काम निविदा न काढता थेट पद्धतीने देण्यात आले आहे. सल्लागार म्हणून सात जणांची नेमणूक केली जाणार आहे. ई अॅण्ड वाय एलएलपी या कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून जून २०२१ मध्ये नियुक्ती झाली होती आणि कामाची मुदत जून २०२३ मध्ये संपली, तरी काम पूर्ण झाले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. सीसीटीव्हीचा उद्देश सार्वजनिक वाहतुकीवर नियंत्रण, वाहतूक नियमांचे पालन, गुन्हेगारीवर देखरेख आणि बीआरटी थांब्यांची सुरक्षा करणे आहे. वारंवार मुदतवाढ आणि वाढत्या खर्चामुळे हे काम चौथ्या मुदतवाढीनंतर तरी पूर्ण होईल का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *