Fifteen Hundred Volunteers from Pimpri-Chinchwad Participate in Cleanliness Campaign at Dehu and Bhandara Dongar डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देहू आणि भंडारा डोंगर स्वच्छ

0

देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानंतर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देहू आणि भंडारा डोंगर येथे मोठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सोमवारी पार पडलेल्या या उपक्रमात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे दीड हजार श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. “स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व श्रीसदस्यांनी एकत्र येत देहू गावातील मुख्य रस्ते, मंदिर परिसर आणि इंद्रायणी नदीचा किनारा स्वच्छ केला. तसेच, भंडारा डोंगरावरील पवित्र स्थळांचीही स्वच्छता करण्यात आली.

या व्यापक स्वच्छता अभियानात सुमारे १६ टन कचरा गोळा करण्यात आला. या कार्यामुळे देहूगाव दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे स्वच्छ दिसत होते.

सकाळच्या सुमारास श्रीसदस्य देहू आणि भंडारा डोंगर परिसरात दाखल झाले आणि त्यांनी दोन तासांच्या आत देहू परिसरातील कचरा साफ केला. या मोहिमेद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक संदेश गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed