Flying Birds International School Annual Meet in Full Swing फ्लाईंग बर्डस इंटरनॅशनल स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात
चिखली, संस्थेच्या श्री शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,चिखली या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात ” कै .अंकुशराव लांडगे नाट्यगृह ” भोसरी येथे दुपार सत्रात पार पडले . यावेळी आवर्जून शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने सन्मानित केले .विद्यार्थ्यांनी नृत्य व नाट्य त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मा श्री संजयजी नाईकडे साहेब , मा सहायक लेखा अधिकारी श्री अनिलजी लोंढे , जाधवर फाउंडेशन संस्थेचे प्रमुख ॲड शार्दुल जाधवर , युवासेना सचिव श्री विश्वजीत बारणे , ॲड बाळासाहेब गर्जे , शिवसेना उपशहर प्रमुख अर्जुन बारगजे , शिवसेना जिल्हा समन्वयक श्री नितीन ताम्हाणे , उद्योजक श्री निलेश पवार , नगरसेवक सौ संगीताताई ताम्हाणे ,नगरसेवक सुरेश तात्या मेत्रे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते .