Fraud Cases Rising from APK Files Sent via WhatsApp in Pimpri-Chinchwad व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेल्या एपीके फाईल्समुळे नागरिकांची फसवणूक

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. नागरिकांना पाठवण्यात येणारे एसएमएस ‘देवेश जोशी’ या नावाने आहेत. यामध्ये म्हटले जात आहे, “प्रिय ग्राहक, मागील महिन्यातील बिल न भरल्यामुळे रात्री ९ वाजता पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कृपया तात्काळ खालील नंबरवर कॉल करा.”

तसेच, व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये एक एपीके (APK) फाईल पाठवली जात आहे. ही फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल फोनमधील डेटा, बँक खात्याची माहिती, पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती मिळवली जाते, ज्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना अशी बनावट एसएमएस दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या एसएमएसच्या बाबतीत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाणे किंवा टोल फ्री क्रमांक १९०३ वर संपर्क करावा.

सध्या महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन विविध माध्यमांद्वारे करण्यात जात आहे. तसेच, थकीत पाणीपट्टी भरणाऱ्या मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे.

यामुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आपली सुरक्षा राखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed