Fraud of ₹31,58,857 Committed by Luring with False Investment Returns गुंतवणुकीच्या जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवून ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक

0

पिंपळे गुरव येथील ५२ वर्षीय व्यक्तीला गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्यादीने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीला एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतले गेले. त्यानंतर, ग्रुपमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आणि त्यानुसार, फिर्यादीला मोबाइलवर “झेडडी ट्रेड प्रो” हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो, असे भासवले गेले.

यावरून, फिर्यादीने त्याच्या बँक खात्यावर ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणुकीवर परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्यामुळे त्याची फसवणूक झाली. सांगवी पोलिस ठाण्यात गितीका आनंद आणि इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed