Free Health Checkup Camp Organized by D.V. Joshi Charitable Foundation and SAI Deep ENT Hospital at Tamhini डी व्ही जोशी चॅरिटेबल फाउंडेशन व साईदीप हॉस्पिटलच्या वतीने ताम्हिणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पिंपळे सौदागर, डी व्ही जोशी चॅरिटेबल फाउंडेशन आणि साईदीप इ एन टी हॉस्पिटल, पिंपळे सौदागर यांच्या वतीने, श्री विंझाई देवी हायस्कूल, ताम्हिणी, तालुका मुळशी येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात दिवसभरात १७० हून अधिक विद्यार्थ्यांची व काही ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या दरम्यान १८ विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे समोर आले. त्यांची नोंदणी साईदीप हॉस्पिटलच्या पुढील शस्त्रक्रिया शिबिरासाठी करण्यात आली आहे. तसेच ७ मुलांना श्रावणदोष असल्याचे दिसून आले, त्यांना श्रावण यंत्र पुरविण्यासाठी निधी संकलन सुरू केले आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांना नैमित्तिक आजारांसाठी उपचार व औषधे दिली गेली. शिबिरात निस्वार्थीपणे काम करणारे डॉ. निकिता, नीलम, श्री रमेश आणि जॉन यांचे मनापासून आभार. तसेच संस्थेचे मुख्याध्यापक श्री शेख, श्री कडू, श्री गोरे व श्री पवार साहेब यांचे डॉ अमोल जोशी यांनी आभार मानले.