Grand Job Fair Organized by Youth Sena on the Occasion of MP Shrirang Barne’s Birthday श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
Grand Job Fair Organized by Youth Sena on the Occasion of MP Shrirang Barne's Birthday श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Grand Job Fair Organized by Youth Sena on the Occasion of MP Shrirang Barne's Birthday श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

चिंचवड, खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना पुणे जिल्हा समन्वयक श्री. सागर पाचरणे यांनी पुढाकार घेऊन भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट तरुण पिढीस रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होते. युवासेनेच्या या उपक्रमाला युवक-युवतींचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

यावेळी युवासेना पच्छिम महाराष्ट्र सचिव श्री. विश्वजीत बारणे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रुपेश कदम, शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ. शैलाताई पाचपुते, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, खंडूशेठ चिंचवडे, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर संघटिका सौ सरिताताई साने, शिलाताई भोंडवे यांसह मोठ्या संख्येने युवक-युवती व पदाधिकारी उपस्थित होते.

रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed