Grand Palakhi Procession at Shri Gajanan Maharaj Temple श्री गजानन महाराज मंदिरात भव्य पालखी सोहळा

Grand Palakhi Procession at Shri Gajanan Maharaj Temple श्री गजानन महाराज मंदिरात भव्य पालखी सोहळा
चिंचवड, तानाजीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या वतीने ‘श्री’च्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात आळंदीतील वारकऱ्यांची दिंडी, बॅंड पथक, पारंपरिक आभूषणाने सजवलेले अश्व, आणि बॅंड पथकासह शेकडो भक्तगण सहभागी झाले. संपूर्ण नगरप्रदक्षिणेदरम्यान वातावरण भक्तिमय झाले.
पालखी सोहळा श्री गजानन महाराज मंदिरापासून सुरु होऊन झुंजार युवक मंडळ, श्री शिवाजी उदय मंडळ, काकडे पार्क, केशवनगर, धनेश्वर मंदिर, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, चिंचवडचा राजा गणपती मार्गे, पॉवर हाऊस चौक, बस स्टॉप – लिंक रोड मार्गे, कालिका माता मंदिर व परत तानाजीनगर येथील गजानन महाराज मंदिर असा मार्ग पार करत गेला. भक्तांनी विविध ठिकाणी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
मोरया देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी मंगलमूर्ती वाड्याजवळ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत केले.
या शाही सोहळ्याच्या आयोजनात श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त आणि सदस्य विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्याध्यक्ष प्रताप भगत, श्रीपाद जोशी, विष्णू पूर्णये, दत्तात्रेय सावकार, संजय खलाटे, देविदास खुलथे, श्रीकांत अनावकर, महेश गोखले, सचिन बलकवडे, बाळकृष्ण मराठे यांचे सहकार्य लाभले.
मंदिरात श्री गजानन महाराज यांच्या आरतीने या भव्य सोहळ्याची सांगता झाली.