Groundbreaking Ceremony for Central Fire Station and Prabodhini Building in Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि प्रबोधिनी इमारतीचे भूमिपूजन

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिंद्रा अँथिया सोसायटीजवळ साडेपाच एकर भूखंडावर मध्यवर्ती अग्निशामक केंद्र व प्रबोधिनी इमारतीचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरातील अग्निशमन सेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये तांत्रिक प्रशिक्षणासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मुख्यालयाच्या इमारतीचे आठ मजले उभारले जाणार आहेत. अग्निशमन कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी ५० आसन क्षमतेच्या विविध कार्यशाळा कक्ष आणि प्रशिक्षण कक्ष असणार आहेत.

या परिसरात १५ मजली निवासी इमारतही उभारली जाणार आहे, ज्यामध्ये अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ११८ निवासस्थाने उपलब्ध करुन दिली जातील. याशिवाय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि चर्चासत्रांसाठी २०० आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह देखील असणार आहे. एकाच वेळी १०० प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास सुविधा देखील प्रदान केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed