GST office female officer arrested for taking bribe जीएसटी कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

GST office female officer arrested for taking bribe जीएसटी कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

GST office female officer arrested for taking bribe जीएसटी कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

GST office female officer arrested for taking bribe लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू व सेवा (जीएसटी) कार्यालयातील महिला राज्य कर अधिकाऱ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राज्य कर अधिकारी मालती रमेश कातळे (वय ४३) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून बुधवारी सायंकाळी वस्तू व सेवा कर कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने पत्नीच्या नावे जीएसटी क्रमांक मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. राज्याच्या महसूल अधिकारी मालती कातळे यांच्याकडे अर्ज प्रलंबित होता.

लॉन्ड्री चालकाला कपड्याच्या बंडलमध्ये 7 तोळे सोन्याचे दागिने सापडले

यानंतर कातळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावले. जीएसटी क्रमांक देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार आल्यानंतर तपास करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कातळे याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक डॉ.शीतल जानेवे, उपअधीक्षक नितीन जाधव व पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोवणे तपास करत आहेत.

तळेगाव दाभाडे परिसरातून १९ चोरीच्या दुचाकींसह आरोपीला अटक