Hinjawadi to Shivajinagar Metro Route 82% Complete, Metro to be Operational by October 2025 हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग ८२% पूर्ण, ऑक्टोबर २०२५ मध्ये मेट्रो सुरू होणार

प्रस्तावित खर्च ८,३१३ कोटी रुपये, २३.३ किमी लांबीचा मार्ग, २३ स्थानकांची संख्या

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे सुमारे ८२% काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची मेट्रो २०२५ च्या ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची कुल लांबी २३.३ किलोमीटर असून, एकूण २३ स्थानके असणार आहेत.

प्रस्तावित खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर कार्यान्वित होतो. पूर्वीच्या दिरंगाईमुळे पीएमआरडीए ने ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती, त्यानंतर जुलैपासून कामाला वेग आला आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी चिंचवड यांना जोडणारा तिसरा मेट्रो मार्ग आहे. हा मार्ग उन्नत असून, पुणे-बंगलुरू महामार्ग आणि मुळा नदीवरून जातो. शिल्लक कामामध्ये बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकांची कामे, तसेच जिने आणि अकरा स्थानकांची महत्त्वाची कामे बाकी आहेत.

या कामांचे पूर्ण झाल्यावर मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे.

You may have missed