Important notice by PCMC द्वारे महत्वाची सूचना
Important notice by PCMC द्वारे महत्वाची सूचना
PCMC 3 ऑगस्ट 2023, वीज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये सकाळी 11:00 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी पावना धरण 92.27% क्षमतेने भरले आहे. तरी वीज निर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये सकाळी 11 वाजता 14०० क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पावणा धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी ही विनंती.