India’s Smita Walhekar wins double gold at International Kickboxing Championships आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या स्मिता वाल्हेकरला दुहेरी सुवर्णपदक
India’s Smita Walhekar wins double gold at International Kickboxing Championships तिसरी वाको आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत इंदिरा गांधी क्रीडा संकुल, दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत जगभरातील २० देशांतील १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारताच्या स्मिता वाल्हेकरहिने ७० किलोपेक्षा कमी वजनी गटात पॉईंट फायट आणि लाइट कॉन्टॅक्ट या दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला दुहेरी सुवर्णपदक मिळवून दिले.
निगडीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली
तसेच ५५ किलोखालील वजनी गटात पॉईंट फायट प्रकारात मेघा गावडेने सुवर्णपदक, ६० किलो वजनी गटात पूजा वाल्हेकरने फुल कॉन्टॅक्ट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच आर्या आंबरे यांना रौप्यपदक, वैष्णवी तिजगे यांना कांस्यपदक, साईराज धुमाळ यांना सुवर्णपदक, रुहान गुलाटी यांना कांस्यपदक, यश वाल्हेकर यांना कांस्यपदक मिळाले.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना घेऊन गेलेल्या स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या प्रशिक्षक सुप्रिया वाल्हेकर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून देशाला पदक मिळवून दिल्याबद्दल सलग सहा महिने या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्पर्धकांचे आभार मानले.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत आहोत; मुघलांशी नाही – योगी आदित्यनाथ
दिल्ली किक बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. जागतिक किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रॉय बेकर, तांत्रिक समितीचे अध्यक्ष रोमियो देसा, तातामी स्पोर्ट्सचे अध्यक्ष ब्रायन बेक, रिंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष युरी, उपाध्यक्ष सलीम कायकी, भारताचे अध्यक्ष संतोष कुमार, महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय समिती सदस्य या स्पर्धेला उपस्थित होते.