Instructions to take strict action against vehicle vandalism in Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश

Instructions to take strict action against vehicle vandalism in Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांवर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, पुण्यातील बिबवेवाडी आणि येरवड्यात अशी घटनां घडली, पण पिंपरी-चिंचवडमध्ये त्याप्रकारे होऊ नये. “पिंपरी-चिंचवडमध्ये अशी घटनां होऊ नयेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील अशा घटनांवर तत्काळ नियंत्रण ठेवावे,” असे पवार म्हणाले.
पवार यांनी पोलिसांसाठी इमारती आणि अन्य साधनसामग्रीसाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलिसांना अँटी-ड्रोन गन दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांनी पुण्यातील वाहन तोडफोडीच्या घटनांचा संदर्भ देत पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकाराच्या घटनांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. “कोणत्याही व्यक्तीला संविधानाच्या बाहेर जाण्याचा अधिकार नाही. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, त्यांचा बंदोबस्त करा. मोक्का लावा, काय करायचं ते करा,” असे पवार यांनी पोलिसांना स्पष्ट केले.
तसेच, त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि सुविधांची पुरवठा करण्याची ग्वाही दिली. पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी कोट्यवधी रुपयांच्या इमारती उभारण्याचा आणि वाहने पुरवण्याचा विचार करण्यात येत आहे.