JE Vaccination Drive Launched in Pimpri-Chinchwad for Children Aged 1-15 पिंपरीत ‘जेई’ लसीकरण मोहिमेची सुरुवात, एक ते १५ वयोगटातील मुलांसाठी मोफत लस

JE Vaccination Drive Launched in Pimpri-Chinchwad for Children Aged 1-15 पिंपरीत 'जेई' लसीकरण मोहिमेची सुरुवात, एक ते १५ वयोगटातील मुलांसाठी मोफत लस
पिंपरी चिंचवड, ५ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत, एक ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत ३५ हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये या लसीचा मोफत पुरवठा करण्यात येत आहे. ‘जेई’ या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, ते आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावेत आणि मुलांना लस देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावीत.
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात शालेयस्तरावर ही लस मोफत दिली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून अधिकाधिक नागरिकांनी आपल्या घरातील एक ते १५ वयोगटातील मुलांना लस दिली पाहिजे.
‘जेई’ (जापनीज एन्सेफलायटिस) हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. यामुळे मेंदूला इन्फेक्शन होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. लसीकरणामुळे या आजाराचा प्रादुर्भाव कमी होईल आणि मुलांचे जीवन वाचवता येईल.