Job Fair for Divyangs to be Organized in Pune with Over 200 Vacant Positions Available हिंजवडीत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन, २०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध

Job Fair for Divyangs to be Organized in Pune with Over 200 Vacant Positions Available हिंजवडीत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन, २०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध
हिंजवडी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, पुणे आणि अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्ट, बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडीत दीनदयाल उपाध्याय दिव्यांग रोजगार मेळाव्याचे” आयोजन सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता ग्रँड तमन्ना हॉटेल, प्लाट नं १६, फेज-२, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे येथे करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त श्री. सा.बा. मोहिते यांनी दिली.
या दिव्यांग रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील २० पेक्षा जास्त नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत. या उद्योजकांकडून ९०० पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आले आहेत. या सर्व रिक्तपदांसाठी किमान १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध पात्रताधारक दिव्यांग उमेदवारांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक दिव्यांग उमेदवारांना या मेळाव्याद्वारे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांसाठी अर्ज करावा. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. मुलाखतीसाठी उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणाव्यात.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधा किंवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क करा, असे श्रीमती मोहिते यांनी कळवले.