Joint Anti-Encroachment Action Planned in Pune and Pimpri-Chinchwad from March 17-30 १७ ते ३० मार्च दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण हटवण्याची संयुक्त कारवाई

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी १७ ते ३० मार्च दरम्यान पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर अनेक विभाग यात संयुक्तपणे कारवाई करणार आहेत.

यापूर्वी १३ मार्चपर्यंत विविध मार्गांवर अतिक्रमणविरोधी कारवाई झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी ते सांडभोरवाडीपर्यंत ८९८ अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. पुणे-सोलापूर रस्त्यावर १०४७ स्ट्रक्चर्सवर आणि चांदणी चौक ते पौड रस्त्यावर ५५७ स्ट्रक्चर्सवरील कारवाई झाली.

आता दुसऱ्या टप्प्यात १७ ते ३० मार्चपर्यंत पुणे-सातारा रोड (नवले पूल ते सारोळे), सूस रस्ता, हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर ते माण, तळेगाव-च्चाकण-शिक्रापूर आदी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *