Key Milestones Achieved in Pune Metro Project, 100% Land Handed Over पुणे मेट्रो प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण, १००% जागा हस्तांतरित

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाला गती दिली आहे. हा २३.२०३ किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प पीपीपी (Public-Private Partnership) तत्वावर अंमलात आणला जात आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या अंमलबजावणीला ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने मान्यता दिली होती, आणि त्यानंतर यावर काम सुरू करण्यात आले.

प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. सोबत एक सवलतकरारनामा केला आहे, ज्याच्या आधारे सर्व आवश्यक जागा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या प्राधिकरणाने मेट्रो सवलतकार कंपनीस ९९.९४% जागा हस्तांतरित केली आहे आणि मेट्रो प्रकल्पाचे काम ८३% पूर्ण झाले आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागांचा हस्तांतरणाचा मुद्दाही लवकर सोडवण्यात आले आहे. विशेषत: पुणे विद्यापीठाजवळील राजभवन, पुणे आवारातील २६३.७८ चौ.मी. जागेचा मुद्दा, जीना बांधकामासाठी आवश्यक होती, यावर राजभवन कार्यालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १००% जागा प्राधिकरणाच्या ताब्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed