let’s start the work for municipal elections Madhuri Misal पालिका निवडणुकीच्या कामाला लागा माधुरी मिसाळ
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुण्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. सध्या राज्यभर भाजपा सदस्य नोंदणी अभियान उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहे. पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीवर येथील जनतेने दाखविलेला विश्वास या अभियानाच्या माध्यमातून दृढ होईल याची खात्री आहे. यावेळी उपस्थित मान्यवर सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक विकास मंत्री व आमदार माधुरी मिसाळ आणि आमदार विक्रांत पाटील यांनी भाजयुमोचे प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांना सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळेत मार्गदर्शन केले. समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची माहिती दिली गेली पाहिजे असे आवाहन देखील केले. यावेळी १५० युवकांचा भाजपा पक्षप्रवेश देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
महापालिका पार्श्वभूमीवर स्वबळाची तयारी भाजपने सुरू केली आहे. नवीन सदस्य नोंदणी आणि आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक येत्या मार्च एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची कार्यशाळा झाली.
यावेळी भाजपा महासचिव विक्रांत पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, निखिल चव्हाण, पिंपरी-चिंचवड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज तापकीर, पुणे ग्रामीण उत्तर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष साकेत जगताप, योगेश मैंद, बादल कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक, निवेदिता एकबोटे, अमृत मारणे, प्रिया पवार, प्रदेश सचिव रोनक शेट्टी, करण मिसाळ उपस्थित होते.