Lottery for Affordable Housing Scheme by PMRDA to be Drawn पीएमआरडीएच्या परवडणाऱ्या घरे योजनेची लॉटरी सोडत

Attention to constructions within 'PMRDA' limits 'पीएमआरडीए' हद्दीतील बांधकामांवर लक्ष
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ अंतर्गत परवडणारी घरे योजनेच्या लाभार्थ्यांची लॉटरी बुधवारी (ता. १२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली जाईल. मुंबईतील मलबार हिलमधील मंत्रिमंडळ परिषद सभागृह, सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम होईल.
पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक १२ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ आणि एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ मध्ये ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ आणि एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ अशा एकूण १,३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३,२७१ अर्ज सादर करण्यात आले होते, ज्यापैकी ३,२५६ लाभार्थी पात्र ठरले आहेत.
सोडतीचा कार्यक्रम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात स्थानिक पातळीवर होईल. अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.