Married woman murdered in Kasarwadi कासारवाडीत विवाहितेचा खून

कासारवाडी, ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नथु लांडगे चाळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासारवाडी येथे घडली. आरोपीने विवाहितेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात वार केले. याप्रकरणी संतोष नथु लांडगे (वय ४८, रा. कासारवाडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुनेंदू मंडल (वय ३२, रा. ओरिसा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा पती फिर्यादी यांच्या खोलीत राहत होते. गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार केले. महिलेच्या पतीवर संशय आल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed