Medical check-up of senior citizens by Navachaitanya Hashiyoga Mandal in the pradhikaran प्राधिकारणात नवचैतन्य हास्ययोग मंडळातर्फे ज्येष्ठांची वैद्यकीय तपासणी
आकुर्डी: नवचैतन्य हास्ययोग मंडळातर्फे संत तुकाराम उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या वेळी ९० ज्येष्ठांनी शिबिरात सहभागी होऊन विविध आरोग्य चाचण्या करून घेतल्या.
कार्यक्रमास संघाचे संस्थापक डॉ. गुणवंत चिखलीकर, आरोग्य समितीप्रमुख डॉ. दिगंबर इंगोले, अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे उपस्थित होते. डॉ. अभिषेक करमरकर, शुभांगी मेहत्रे, राजेश्वरी साळुंखे, राहुल बोंद्रे, डॉ. पृथ्वीराज उगळे यांनी ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली. या वेळी ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला देण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.