MLA Shankar Jagtap Calls for Immediate Action to Prevent Industrial Pollution in Rivers आमदार शंकर जगताप यांचे सरकारकडे नदी प्रदूषणावर तत्काळ कारवाईचे आवाहन

0
MLA Shankar Jagtap Calls for Immediate Action to Prevent Industrial Pollution in Rivers आमदार शंकर जगताप यांचे सरकारकडे नदी प्रदूषणावर तत्काळ कारवाईचे आवाहन

MLA Shankar Jagtap Calls for Immediate Action to Prevent Industrial Pollution in Rivers आमदार शंकर जगताप यांचे सरकारकडे नदी प्रदूषणावर तत्काळ कारवाईचे आवाहन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये रासायन मिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीवर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी लक्ष वेधले आणि नदी प्रदूषण थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.

आमदार जगताप यांनी प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. “नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी MPCB काय भूमिका बजावत आहे आणि दोषी असलेल्या उद्योगांवर कारवाई कधी केली जाईल?” असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याच्या पर्यावरण मंत्री, मा. पंकजाताई मुंडे यांनी यावर गंभीर दखल घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही उद्योगाला प्रक्रियेतून निघालेल्या रासायन मिश्रित सांडपाणी नदीत सोडण्याची मुभा दिली जाणार नाही. “अशा उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

तसेच, पर्यावरण मंत्री यांनी नदी प्रदूषणाचे कारण असलेल्या कंपन्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, “कोणत्याही विशिष्ट प्रकरणाची तक्रार आल्यास, तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.” याबरोबरच, नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.

आमदार शंकर जगताप यांनी पुढे आणले की, “नद्यांच्या शुद्धतेसाठी महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.” तसेच, नदी प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि याबाबत सर्व संबंधित संस्थांना कडक पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कडक निर्णयानंतर नदी प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होईल, असे आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed