MLA Shankar Jagtap thanked for being elected in the assembly by huge votes विधानसभेत प्रचंड मतांनी निवडून दिल्याबद्दल आमदार शंकर जगताप यांचा आभार मेळावा
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चिंचवडकरांनी प्रचंड आशीर्वाद देत मला भरघोस बहुमताने विजयी केले. या विजयानंतर, माझ्यावर विश्वास ठेवलेल्या पिंपळे-सौदागर परिसरातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना धन्यवाद व ऋण व्यक्त करण्यासाठी पी.के.इंटरनॅशनल स्कुल येथे आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात शंकर जगताप यांच्याकडून करण्यात आले होते. या मेळाव्याला उपस्थित राहून भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी, नागरिक बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानले. चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी, तसेच आपल्या विधानसभेला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असे वचन दिले. आगामी काळात शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, अध्यात्म, क्रीडा तसेच मुलभूत सुखसुविधांसह,माझ्या लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, माय-माऊली यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटलायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती – शेखर सिंह
तसेच अत्यंत प्रामाणिकपणे नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदू समाज, सजग रहो मंच, बजरंग दल या सर्व मातृसंघटनांचे, तसेच नमो ३.० ग्रुप व सर्व समाजाचे दिलेल्या पाठींब्यासाठी विशेष आभार मानले.
PCMC सिटी कॉमेडी फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा !
यावेळी राष्ट्रवादीचे नेते श्री.विठ्ठल नाना काटे, शहर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष श्री.शत्रुघ्न बापू काटे, माजी नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे, सामाजिक कार्यकर्ते श्री.जयनाथजी काटे, पी.के.इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक श्री.जगन्नाथजी काटे, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय भिसे, श्री.संदेश काटे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक श्री.संदीप काटे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सहसंपर्कप्रमुख श्री.मनोज ब्राह्मणकर, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिताताई काटे, श्री.संकेत कुटे, श्री.शेखर कुटे, श्री.कैलास कुंजीर, श्री.उमेश काटे, श्री.रामदास कस्पटे, श्री.मचिंद्र काटे यांच्यासह सर्व महायुती पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व सोसायटीचे चेअरमन, सदस्य आणि नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.
रावसाहेब दानवे यांच्याकडून पिंपरी-चिंचवड मधून निवडून आलेल्या विधानसभा सदयसीयांचा सन्मान